Header Ads

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उदयनराजेची सदीच्छा भेट satara

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्यातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांची सदीच्छा भेट घेतली व सातारा मतदार संघातून प्रचंड मताधिक्यांनी महाराज निवडून यावेत म्हणून सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विकास पवार, माढा मतदारसंघाचे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार आदी मनसैनिकांनी साताऱ्यात खा.उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष भेटून प्रचारकार्यात सक्रिय सहभागी होत संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी रान उठवणार असल्याचे सांगितले.

कोणतीही जात धर्म पंत वरिष्ठ कनिष्ठ असा भेद न पाळता  श्री. छ. उदयनराजे भोसले समाजाच्या सर्व घटकांना न्याय देतात त्यांच्या सारखा नेता खऱ्या अर्थाने जिल्यातील प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतो फार कमी लोकांकडे हा गुण असतो, आम्ही या पूर्वीही महाराजांवर प्रेम करत होतो आताही करतो आणि सदैव करत राहू. शिवछत्रपतींचे वारस म्हणून सदैव आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी सेनेचे युवराज पवार , मनसेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा संघटक नितीन महाडीक, जिल्हा उपाध्यक्ष राजू केंजळे, महेश जगताप, पाटणचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, कराड तालुकाध्यक्ष दादा शिंगण, सागर बर्गे , जावळी तालुका अध्यक्ष अश्र्विन गोळे ,सतीश यादव आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीतील  मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला पाठिंबा आपणासाठी महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया खा.उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

No comments