Header Ads

निवडणूक निरीक्षकांनी केली स्ट्रॉंगरुमची पहाणी satara

सातारा : ४५-सातारा लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभमीवर आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार आणि पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरींदरकुमार कालीया यांनी आज सातारा येथील स्ट्राँग रुमची पहाणी केली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी यावेळी उपस्थित होते. विधानसभानिहाय ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणा ठेवण्यात येणार असून या जागांची पहाणी केली. तसेच मतमोजणीच्या दिवशी  करण्यात येणाऱ्या व्यवस्थेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. तसेच निवडणूक निरीक्षकांनी पोस्टल बॅलेटबाबत काय व्यवस्था केली आहे याबाबत विचारणा करुन मतमोजणीच्या स्ट्राँगरुमची जी उरलेली कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचनाही यावेळी निरीक्षकांनी दिल्या.

No comments