Header Ads

जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत उदयनराजेंशी समोरा-समोर बोलेन : नरेंद्र पाटील satara

सातारा : लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत. आता मी २३ प्रश्न त्यांना विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्पष्ट केली नाहीत तर समोरासमोर बोलायलाही माझी तयारी आहे, असे जाहीर आव्हान शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, विक्रम पावसकर, भरत पाटील, हणमंत चवरे उपस्थित होते.   

पाटील म्हणाले, उदयनराजेंनी संसदेत १० वर्षे खासदार म्हणून काम केलं. त्यांनी या काळात किती प्रश्न विचारले?, त्यांची संसदेतील हजेरी किती काळ होती?, जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याकरिता त्यांनी किती तास चर्चेत सहभाग घेतला?, जीएसटी आणि नोटबंदीच्या विषयांवर ते टीका करत आहेत, मग या निर्णयांमुळे देशातील जनतेचे काय नुकसान झालं, याबाबत त्यांनी संसदेत मत मांडलं का?, त्यांनी खासदार निधीचा वापर नेमका कोणत्या तालुक्यात आणि किती केला?, दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी जिंकल्या होत्या. त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींची त्यांनी वचनपूर्ती केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वंशज असल्याचे सांगतात, मग प्रतापगडाची दुरवस्था दूर करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली?, साताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही?, आदी प्रश्न मी उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे उदयनराजेंनी द्यावीत.’उदयनराजे भोसले दहा वर्षे खासदार होते. मात्र, त्यांचे कार्यालयही साताºयात नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर त्यांच्या राजवाड्याबाहेर जाऊन थांबावे लागते. त्यातूनही महाराज भेटतील, याची शक्यता अधांतरिच असते. सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. संसदेच्या माध्यमातून या शेतकºयांचे प्रश्न का सोडवता आले नाहीत?, राजवाड्यात अनेकदा चोºया झाल्या; पण एकाही चोरीबाबत खासदार उदयनराजेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० या आरटीओ रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांना टोलनाका मोफत का केला नाही. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांचे करोडो रुपये खासगी इन्व्हेस्टिंग कंपन्यांत अडकले आहेत, त्यांच्याबाबतही आवाज उठवला नाही. मात्र मी पुढच्या काळात हे प्रश्न धसास लावणार आहे. माझ्या प्रश्नांबाबत समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

No comments