Header Ads

वणवा विझवताना युवक भाजला satara

सातारा : बोगदा परिसरात लागलेला वणवा विझवताना मंगळवार पेठेतील एक युवक भाजला असून तो गंभीर आहे. त्याच्यावर येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालया उपचार सुरु आहेत. रविवारी ही घटना घडली असून सचिन जांगळे असे भाजलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन रामचंद्र जांगळे (वय १८, रा. ४0८, मंगळवार पेठ, बोगदा, सातारा) हा घराजवळ लागलेला वणवा विझवत होता. यावेळी त्याच्या दोन्ही हाताचे पंजे आणि पायाचे तळवे भाजले. यामुळे त्याला चालता येत नव्हते. या घटनेनंतर त्याला नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

No comments