Header Ads

राजमातांच्या आगमनाने भारावल्या वाड्या-वस्त्या ; खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ राजमाता श्री.छ.कल्पनाराजे भोसले प्रचाराच्या रिंगणात satara

पाटण : खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांना सलग तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्याचा निर्धार डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या माता- भगिनींनी केला असून खऱ्या अर्थाने रयतेचा राजा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत जात असल्याचाच अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया पाटण तालुक्यातील महिला व तरुण वर्गाने व्यक्त केली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय (गवई गट), आरपीआय (कवाडे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमिक मुक्ती दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना व मित्र पक्ष  यांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ  राजमाता श्री. छ कल्पना राजे भोसले , साताऱ्याच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत, डॉ चंद्रशेखर घोरपडे आदींनी आज पाटण तालुक्यात मल्हारपेठ व लगतच्या वाड्या- वस्त्यांवर प्रचार मोहीम राबवली, त्यादरम्यान महिला, तरुण  व जेष्ठ नागरिकांनी  खा.  श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित असून त्यांच्या मताधिक्यात या वेळी आणखी वाढ होईल, असे अभिवचन राजमातांना दिले.

मल्हारपेठ येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सत्संग व समर्थ बैठक सोहळ्यातील नामधारक महिलांनी यावेळी निश्चितच महाराजसाहेब विजयी  पताका फडकावतील, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.  निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राजमाता आमच्या घरी व गावी आल्या याचे आम्हास समाधान वाटते असेही उपस्थित महिलांनी सांगितले. उपस्थितांशी संवाद  साधतांना राजमाता श्री. छ.  कल्पनाराजे भोसले म्हणाल्या की, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने या परिसरात आल्यावर सांस्कृतीक व धार्मिक उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद वाटतो व समाधानही वाटते. संत मार्गाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींनी दिलेले आशीर्वाद बहुमोलाचे आहेत. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी झालेली गर्दी पाहता यश आपलेच आहे, याची खात्री वाटते. तरीही देशात प्रथम क्रमांकाची मते मिळवून आणखी विक्रम घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेस व रेकॉर्डब्रेक मतदान आणि सर्वाधिक मतदान हा विक्रम हे या निवडणुकीचे वैशिष्ठे असेल, त्यासाठी वडीवस्तीवरील सर्वसामान्य रयतेने आग्रही राहावे. डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या व देशाला दिशा देणाऱ्या सत्संग वर्गातून मिळालेले आशीर्वाद संस्मरणीय ठरतील. माता-भगिनी यांचा मिळणार प्रतिसाद आणि तरुणाईचे महाराजांवरील अलोट प्रेम हा विजयाचा पाया  आहे, उदयनराजेंनी जिथे जाईल, तिथे माणसे जोडली.  ही जोडलेली माणसे विजयासाठी प्रयत्न करीत आहेत, याचे समाधान वाटते . नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिथे कुणी पोहचत नाही,  त्या  ठिकाणी महाराज जातात. त्यामुळे जनतेचे खरे खुरे नेते हि त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा विजय हि औपचारिकता असून सर्वांनी कसोशीने प्रयत्न करून उदयनराजेंना विक्रमी मतांनी  विजयी करा.

रंजना रावत म्हणाल्या की, जनतेसाठी सतत कार्यरत राहणे हा  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले  यांचा स्वभाव आहे त्यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्व मुले जनतेचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. विकासाची ही परंपरा अखंड सुरु राहण्यासाठी प्रचंड मताधिक्याने महाराजांना सलग तिसऱ्यांदा संसदेत पाठवण्याचा संकल्प सर्वांनी करावा. कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम आणि शिवछत्रपतींचा वारसा यामुळे खा श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित होणार आहे, त्यास देशातील प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याची सोनेरी किनार जोडावी म्हणून सर्वांनी योगदान द्यावे. यावेळी सौ. अश्विनी पुजारी, अजित भिसे, अमित भिसे आदींसह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments