Header Ads

कराडात धडाडणार राज ठाकरे यांची मोदीविरोधी तोफ ; १७ एप्रिल रोजी खा.उदयनराजेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा satara

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात ८ ते १० ठिकाणी सभा घेणार आहेत. पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे प्रचारसभा कुठे घेणार याबद्दल त्यांनी सांगितले नव्हते. मात्र आता येत्या १४ एप्रिलपासून राज ठाकरे सातारा जिल्ह्यातील कराडसह अन्य ६ ठिकाणी मोदीविरोधी प्रचारसभा घेण्यास सुरुवात करणार आहेत. १७ एप्रिल रोजी कराड येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांच्या सातारा जिल्ह्यातील समर्थकांनी उदयनराजे यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्यावतीने पाठिंबा व्यक्त केला आहे. यामुळे याचा थेट फायदा उदयनराजे यांना होणार आहे. मोदीमुक्त भारत आणि भाजप पक्षाच्या विरोधात राज ठाकरे आपल्या प्रचारसभा घेणार आहेत. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सुद्धा कराड येथे राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. तर राज ठाकरे यांची सभा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या मतदार संघासाठी प्रचारसभा घेणार आहेत.

१४ एप्रिल : नांदेड
१५ एप्रिल : सोलापूर
१६ एप्रिल : इचलकरंजी
१७ एप्रिल : कराड
१८ एप्रिल : खडकवासला
१९ एप्रिल : अलिबाग

No comments