Header Ads

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाबळेश्‍वर राजभवन विश्रामगृहावर नाचवल्या ‘बारबाला’ ; सार्वजनिका बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार वादाच्या भोवर्‍यात satara

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर येथील राजभवन या विश्रामगृहावर राज्यापाल, मुख्यंमंत्री असे दिग्गज मंत्री विश्रांतीसाठी येतात. या ठिकाणी राज्याचे महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. अशा राजभवन विश्रामगृहावर आचार संहीतानियम धाब्यावर बसवून महाबळेश्‍वर सार्वजनिका बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व ठेकेदारांनी डीजेवर बारबाला नाचवून आनंद व्दीगूनीत केला. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या या ओल्या आणि डान्स पार्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या पार्टीची गंभिर दखल वरीष्ठ पातळीवर घेतली गेली आहे. सार्वजनिक विभागाने या पार्टीची उच्च स्तरीय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे पार्टीला उपस्थित असलेल्या अधिकारी आणि ठेकेदार यांचे कारवाईच्या भितीने चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 31 मार्चचा शिनवटा घालविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यांचे शाख अभियंता आणि त्यांच्या मर्जीतील काही ठेकेदार यांनी महाबळेश्‍वर येथील राजभवन विश्रामगृहावर बारबालाच्या पार्टीचे आयोजन एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केले होते. निवडणुकीची आचार संहीता आणि जमाव बंदी आदेशामुळे विश्रामगृहावर शुकशुकाट़ या संधीचा फायदा घेण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले ही पार्टी 3 व 4 मार्चला पार पडली अभियंता राठोड व त्यांचे बरोबर चार यांनी विश्रामगृहातील सुट क्र. 15 च्या समोर बसुन रात्री दारूची पार्टी केली. या पार्टीमध्ये पाच जण सामिल झाले होते. याच सुटमध्ये डिजे लावण्यात आला होता. डिजेचा आवाज बाहेर जावु नये म्हणुन दरवाजे सर्व बंद करण्यात आले होते. या सुटमध्ये केवळ खास लोकांनाच परवाणगी देण्यात आली होती. पार्टीसाठी पुण्यातुन बारबाला मागविण्यात आल्या होत्या. या बारबालां बरोबर अभियंता आणि ठेकदार यांनी डिजे तालावर बेफाम नाचल्या. या ओल्या, सुक्यात पार्टीची खमंग चर्चा महाबळेश्‍वर शहरात आहे. आचारसंहीता आणि जमाव बंदी आदेश धाब्यावर बसवुन अधिकाराचा गैरवापर करीत अभियंता राठोड यांनी केलेली पार्टी आता वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. या पार्टीतील डिजेचा आवाज राठोड यांच्या हितचिंतकांनी वरीष्ठ अधिकारी यांच्या कानावर घातला त्यामुळे या पार्टीची वरीष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे. पुढील महीन्यात महाराष्ट्ाचे राज्यपाल के विदयासागर हे महाबळेश्‍वर येथील राजभवन येथे विश्रांतीसाठी येत आहे. अशाच वातावरणात येथे बारबालां बरोबर झालेली पार्टीची गांभिर्याने चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी राजभवन येथील सर्व सीसीटिव्हि फुटेज तपासले जात आहे. विशेष म्हणजे ज्या सुटमध्ये ही बारबालांची पार्टी झाली त्या परीसरात कोणताही सीसीटिव्हि नाही त्यामुळे ही पार्टी सीसीटिव्हि मध्ये दिसेल की नाही या बाबत शंका व्यक्त केली जात आहे तरीही परीसरातील फुटेज तपासले जावुन चौकशी केली जाणार आहे.

शाखा अभियंता राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या पार्टीच्या चौकशीसाठी एक पथक महाबळेश्‍वर येथील राजभवनाच्या विश्रामगृहावर येवुन गेल्याची माहीती मिळत आहे. या पथकाने राजभवन परीसारतील दोन दिवसांचे सर्व सीसीटिव्हि फुटेज ताब्यात घेतले आहे. तर दुसरे पथक लवकरच महाबळेश्‍वर येथे चौकशीसाठी येत आहे. दरम्यान या पार्टीची माहीती कोणी पथकातील अधिकारी यांना देवु नये यासाठी गेली दोन दिवस शाखा अभियंता हे महाबळेश्‍वर येथे मुक्कामी आले होते पत्रकारांनी त्यांना त्यांच्या पार्टी बाबत माहीती विचारली असता असा कोणताही प्रकार येथे घडला नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षदर्शी मात्र पार्टीचे रसभरीत वणर्र्न करीत आहेत त्या मुळे राठोड यांची ही पार्टी चांगलीच वादाच्या भोवरयात अडकली आहे आता या पार्टीसाठी राठोड यांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई होणार की चौकशी पथकाला मॅनेज करण्यात राठोड यशस्वी होणार याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष लागुन राहीले आहे. 

No comments