Header Ads

मतदानासाठी ११ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार satara

सातारा : मा.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहिर  केला असून या कार्यक्रमानुसार 45-सातारा लोकसभा मतदास संघामध्ये मंगळवार दि. 23 एप्रिल  2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. मतदानाचा हक्क्‍ बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे.

मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड  यापैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. त्याचप्रमाणे केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील आपले नाव अथवा मतदान केंद्र शोधण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in व  www.nvsp.in  या संकेत स्थळाला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती (Voter slip) ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, तर त्यासोबत मतदार छायाचित्र (EPIC) किंवा उपरोक्त 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रवासी  भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्यक राहील. अधिक चौकशीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा, असे आवाहन श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

No comments