Header Ads

उद्याची निवडणूक हि जावळीच्या स्वाभिमानाची आणि माथाडींच्या अस्तित्वाची लढाई : आ.शशिकांत शिंदे satara

मेढा : उद्याची निवडणूक हि जावळीच्या स्वाभिमानाची आणि माथाडींच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोट्यावधी रुपये बुडवून, देश लुटून काही लोक परदेशी पळून गेले. तरी हा चौकीदार झोपला आहे. त्याचे सरकार घरी बसवण्यासाठी जावळी खो-यातील जनतेने श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन आ.शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर, हातेघर, कावडी, हुमगाव, बामणोली, वडाचे म्हसवे, आनेवाडी येथे संवाद सभा व संपर्क भेटी झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ हा दौरा झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सभापती सुहास गिरी, ऋषीकांत शिंदे, सौरभ शिंदे, अनिल विभुते, नरेंद्र यादव पाटील, रोहिदास मोरे, विठ्ठलदादा पवार,  रोहिणीताई निंबाळकर, अरुणाताई शिर्के, जितेंद्र शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "दुर्गम जावळी तालुक्याच्या कानाकोप-यात पाणी योजना, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आदी विकासकामं पोहचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. जावळी तालुक्यात उदयनराजे - शिवेंद्रसिंहराजे-मी-वसंतराव मानकुमरे ; आम्हीं चौघे असताना या तालुक्याला काहीही कमी पडू देणार नाही. मा. शरद पवारसाहेब यांनी माथाडी कामगारांना घरं मिळवून दिली. माझ्यासारख्या माथाडी कामगाराच्या मुलाला त्यांनी आमदार, मंत्री केले. राज्य आणि केंद्रात ४० वर्षे ते राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. आज त्या पवारसाहेबांना कोणी वैयक्तिक लक्ष करत असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. आजच्या स्थितीत ठराविक,  मुठभर लोकांना मोठं करायचं सरकारचं धोरण दिसते. दुस-या बाजूस शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेणारे शरद पवारसाहेबांचे नेतृत्व आहे. आपण कोणाच्या मागे जायचे हे लोकांनी ठरवावे. सामान्यांच्या हिताचे निर्णय घेणा-या राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या बाजूने जावळी तालुक्यातील जनता कौल देऊन उदयनराजे भोसले यांना बहुमत देईल, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. वसंतराव मानकुमरे म्हणाले, गेल्या ५ वर्षांत धरणांची, कालव्यांची कामं झाली नाहीत. अशा सरकारला धडा शिकवायला हवा. यावेळी माजी सभापती सुहास गिरी, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, डॉ.सुरेश शेडगे यांची भाषणे झाली. यावेळी जितेंद्र शिंदे, दादा पाटील, जयदीप शिंदे, चंद्रकांत तरडे, गोपाळ बेलोशे, विष्णूपंत यादव, नितीन गावडे, बाळासाहेब गोसावी, प्रकाश परामणे, राजेंद्र गोळे, गोपाळ बेलोशे, विकास परामणे, मोहन शिंदे आदी उपस्थित होते.

आजच्या सरकारमुळे माथाडीसुद्धा सुरक्षित नाही

उदयनराजे म्हणाले, माथाडींना संघटीत करण्याचे काम आण्णासाहेब पाटील यांनी केले. आजच्या सरकारमुळे माथाडी सुद्धा सुरक्षित राहिलेला नाही. उदयनराजेंना निवडून द्या हे सांगायला मी आलेलो नाही. तर देश वाचवायचा आहे, त्यासाठी पवारसाहेबांसारखं नेतृत्व बळकट करायचं आहे. धरणं, कालवे, पुनर्वसन यासारख्या मुलभूत प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी प्राधान्याने निधी मिळाला पाहिजे. ते राहिलं, तिकीटं काढायला पैसे नाहीत अन् निघालेत बुलेट ट्रेन सुरु करायला, अशा शब्दात उदयनराजेंनी सरकारवर हल्ला चढवला.

No comments