Header Ads

माजी नगरसेवक खा.उदयनराजेंच्या प्रचारासाठी सरसावले ; प्रभाग क्र.७ मध्ये माजी नगरसेवकांकडून खा.उदयनराजेंचा प्रचार satara

सातारा : महाआघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सातारा शहरातील सर्व माजी नगरसेवक एकत्र येऊन खा.उदयनराजेंच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. प्रभाग क्र.७ चे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या पुढाकाराने सर्व माजी नगरसेवकांकडून एकदिलाने खा.उदयनराजेंचा प्रचार करण्यात आला. प्रचाराची सुरुवात शहर पोलिस ठाण्यापासून करण्यात आली. यावेळी नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचासोबत सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, माजी नगराध्यक्ष अशोक तपासे, माजी नगराध्यक्ष अजित गुजर, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर नाना भोसले, माजी उपनगराध्यक्ष भाऊ दळवी, मा.नगरसेवक बाळासाहेब नाईक, अंकुश भिंगारदेवे, युवराज दभड़े, बाळासाहेब शिरसट, सतीश रावखंडे तसेच जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments