Header Ads

गिरणी कामगारांचा उदयनराजेंना जाहीर पाठिंबा satara

सातारा : कोरेगाव-खटाव तालुका गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब घनवट व त्यांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज श्री.छ.उदयनराजे भोसले यांची येथे भेट घेऊन गिरणी कामगारांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. कोरेगाव-खटाव तालुका गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब घनवट व त्यांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. गिरणी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे कायमच सहकार्य लाभले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या वतीने त्यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब घनवट यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. उदयनराजेंचे मताधिक्य वाढवण्यात गिरणी कामगार मोलाचे योगदान देतील, असा विश्वास बाळासाहेब घनवट यांनी या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब घनवट व त्यांच्या सहका-यांनी पाठिंब्याचे पत्र श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडे सूपूर्द केले. यावेळी संघटनेचे खजिनदार शिरीष पवार, सुधाकर निकम, तानाजी कदम, उत्तम कदम़, पोपट लवंगारे, लक्ष्मण सावंत, रमेश चव्हाण, माजी सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.

No comments