Header Ads

सातारा विधानसभा मतदारसंसघातील ईव्हीएम, व्हिव्हिपॅटयंत्रणा अंतिमरित्या पडताळणी करुन निवडणुकीसाठी सज्ज sataar

सातारा : 262- सातारा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणा निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिमरित्या पडताळणी करुन 45 सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतदनासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

ईव्हीएम, व्हिव्हिपॅट अंतिमरित्या सज्ज करण्याच्या प्रसंगी  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्ष सुरेंद्र झा यांनी ईव्हीएम, व्हिव्हिपॅटच मशिन कसे हाताळावे याविषयी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी ते म्हणाले, ईव्हीएम, व्हिव्हिपॅटचे मशिन वाहतूक करताना व मतदनाच्या दिवशी हाताळताना अत्यंत काळजी घ्यावी, तसेच  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 साठी पहिल्यांदाच ईव्हीएम मशिनसोबत व्हिव्हिपॅट मशिनचा वापर करणार आहे. यामुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले हे मतदान केल्यानंतर काही सेकंद दिसणार आहे. यामुळे निवडणुकीविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये कोणतीही शंका राहणार नाही, असेही निवडणूक निरीक्षक श्री. झा यांनी शेवटी सांगितले.

No comments