Header Ads

भूकंपाने कोयना परिसर हादरला patan

पाटण : गाढ झोपेत असलेल्या कोयना व कोकण किनारपट्टीवासीयांना रविवारी मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने जागे केले. मध्यरात्री 12.29 ला कोयना परिसरात भूकंपाचा धक्‍का जाणवला. भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली. भूकंपाची खोली 11 कि.मी. खोल तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16.8 कि.मी. गोषटवाडी गावाच्या नैर्ऋत्येस 9 कि.मी. अंतरावर असल्याची माहिती कोयना प्रकल्पाच्या भूकंपमापन वेधशाळेने दिली आहे. भूकंपाचा धक्‍का कोयना परिसर, पाटण, पोफळी, अलोरे, चिपळूण परिसरात बसला आहे. भूकंपाच्या धक्क्याने पाटण तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे पाटण तहसीलदार रामहरी भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

No comments