Header Ads

चोराडेत श्री भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न ; गुलालाची उधळन अन् उदंड उत्साह khatav

पुसेसावळी : भैरवनाथाच्या नावान चांगभल, अशा गजरात खटाव तालुक्यातील चोराडे येथील प्रसिध्द श्री भैरवनाथाची यात्रा उदंड उत्साहात व भक्तीभावाने पार पडली. हजारो ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळन करत पालखी व सासनकाठी  मिरवणूक काढण्यात आली. श्री भैरवनाथ हे तमाम चोराडे व परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. या ग्रामदेवताची यात्रा म्हणजे उत्साह अन् भक्तीचा माहोल असतो. शनिवारी चैत्र कालाष्टमीस पहाटे देवास अभिषेक, विविधत पुजा व महाआरती करण्यात आली. चोराडे व परिसरातील भाविकांनी श्री भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच गर्दी केली होती. मंदिर परिसर व प्रागंणात विविध प्रकारची दुकाने, आकाश पाळणे, मेवामिठाई, हारतुरे इत्यादी दुकाने थाटल्याने गावास जत्रेचे स्वरुप आले आहे.

शनिवारी दिवसभर विशेषत महिलांनी मंदीराभोवती लोटांगण घेतले, व भैरवनाथाच्या नावाने चांगभल करीत नवसपूर्ती केली.याचबरोबर  मंदीरामध्ये, पालखीला गोंडा बांधणे,दंडवत घालणे,पुरणपोळी नैवेद्य दाखवणे आदी विधी करण्यात आले. रविवारी सकाळी श्री भैरवनाथाची विविधत पुजा करण्यात आली व श्री भैरवनाथाची  मुर्ती प्रमुख मानकरी यांच्या  हस्ते पालखी मध्ये ठेवण्यात आली व पालखी व  सासनकाठ्या यांनी मिरवणुकीने  ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. यावेळी भाविकांनी गुलाल खोबरयाची उधळन करीत भैरवनाथाच्या नावाने चांगभल म्हणत गजर केला. यावेळी पालखीवर नारळ व नोटांच्या माळेची तोरणे अर्पण केली.यात्रेमध्ये तमाशा,नामवंत मल्लांच्या कुस्त्या,ऑर्केस्ट्रा, हे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात्रेस भाविक व दानशूर देणगीदारांचा हातभार लाभला असुन विश्वस्त भैरवनाथ देवस्थान व यात्रा  कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी चोराडे यात्रेस भेट देऊन यात्रेनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

अवघा आसमंत गुलालमय...

पालखीबरोबर मंदीराचे पुजारी व देवाचे मानकरी होते,पालखी व सासनकाठी मिरवणुकीत लेझीम,गझी,सनई ताफा,बॅण्ड,घोडा,देवाचा मानदंड होता,मानकरी देवाची मनोभावे सेवा करीत होते,प्रामुख्याने युवक वर्ग सासनकाठी नाचवण्यात दंग होता.यावेळी भैरवनाथाच्या नावान चांगभल च्या जयघोषात व गुलाल खोबर्याच्या उधळणीत अवघा आसमंत भरुन गेला होता व गुलालमय झाला होता.

No comments