Header Ads

विश्वस्तास वीणाने मारहाण ; कराड मठाधिपतीवर गुन्हा दाखल crime

कराड : श्री मारुती बुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा ऊर्फ बाजीराव भागवत जगताप (रा.कोडोली) यांच्यावर कराड शहर पोलिसांत मारामारी प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन नानासो चव्हाण यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मठाचे विश्‍वस्त यशवंत दाजी माने हे दिंडीची तयारी करत होते. त्यावेळी बाजीराव मामा तेथे आले व तुम्ही दिंडीची तयारी करू नका. दिंडीची तयारी करणारे तुम्ही कोण ? तुम्हाला जीवंत ठेवणार नाही असे म्हणून दाजी माने यांच्या डोक्यात बाजीराव मामा यांनी विना मारली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी मठात हा प्रकार घडला.

No comments