Header Ads

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून जनरेटर चोरीचा गुन्हा उघड ; दोन संशयित ताब्यात crime

सातारा : सातारा जिल्हयामध्ये लोकसभा निवडणूक-२०१९ अनुशंगाने जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत लिंबखिंड नागेवाडी येथील प्रकाश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचा गोडाऊन मधून १२५ केव्हीएचा जनरेटर डंम्पिंग ट्रॉली ट्रॅक्टरसह सेन्ट्रीग प्लेटा व इतर साहित्य चोरीस गेलेबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याप्रकरणी सागर नागराज गोसावी व प्रवीण युवराज घाडगे दोघे रा.गोसावी वस्ती सैदापूर,ता.जि.सातारा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सातारा शहर व तालुका परीसरात फरारी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सैदापूर गोसावीवस्ती येथे काही इसम जनरेटर, डंम्पिंग ट्रैक्टर ट्रॉली व सेंट्रिगच्या प्लेटसची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहेत. पोलीसांना माहिती मिळताच सपोनि विकास जाधव यांनी दोन पंच सोबत घेवून सदर ठिकाणी पोलीस पथकासह छापा टाकला. घटनास्थळी दोन संशयित इसम व त्यांचे ताब्यात एक १२५ केव्हीएचा किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर, एक ट्रॅक्टरची डम्पिंक ट्रॉलीसह, ३० बांधकामाच्या सेंट्रिग प्लेटसह मिळून आले. संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा नागेवाडी येथील एका गोडाऊन मधून चोरून आणल्याची कबुली दिली. त्यांचे ताब्यात मिळुन आले मालाची एकूण किंमत ५,४०,०००/- रूपये एवढी आहे. सदर दोन संशयित जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी सातारा तालुका पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत स.पो.नि.विकास जाधव, स.फौ.मोहन घोरपडे, पृथ्वीराज घोरपडे, पो.हवा. उत्तम दबडे, संतोष पवार, पो.ना.मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, रविंद्र वाघमारे, रूपेश कारंडे, निलेश काटकर, विजय सावंत, आदींनी सहभाग घेतला.

No comments