Header Ads

फलटणच्या पुरवठादार व पॅकर यांना अप्रमाणित अन्नसाठा प्रकरणी ३ हजारचा दंड व कैदेची शिक्षा crime

सातारा : फलटणच्या किराणा स्टोअर्समध्ये अप्रमाणित अन्नसाठा आढळल्याने फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये यांनी दुकानदारास व पुरवठादारास प्रत्येकी ३ हजार दंड व १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती सातारचे सहायक आयुक्त (अन्न) शि.वा.कोडगीरे यांनी दिली.

५ फेब्रुवारी २०१० रोजी बी.एम. ठाकूर तत्कालीन अन्न निरीक्षक, सातारा यांनी सुनिल जयसिंगराव ढेंबरे, मे. सरस्वती  किराणा स्टोअर्स, कसबा पेठ, फलटण यांच्या दुकानातुन अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये लवंग हा अन्नपदार्थ विश्लेषणासाठी घेतला होता. लवंगामध्ये तपासणीअंती दोष आढळुन आल्याने अप्रमाणित घोषित करण्यात आला होता. यानुसार   प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.  या खटल्यामध्ये दुकानदार सुनिल जयसिंगराव ढेंबरे व पुरवठादार व पॅकर शाम धरमचंद अगरवाल यांना प्रत्येकी दंड रु. ३ हजार ठोठावला असुन प्रत्येकी १५ दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी शि.वा. कोडगीरे, सहायक आयुक्त (अन्न) सातारा यांचे मार्गदशनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मे.स.पवार व विकास सोनवणे यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता.

No comments