Header Ads

साताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार ; पित्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी crime

सातारा : नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यात घडली असून वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांच्या गैरकृत्याला कंटाळून मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी साडेचौदा वर्षाची आहे तर तिचा वडील ३६ वर्षाचा आहे. संबंधित कुटुंबामध्ये मुलीची आई असून ती धुणी-भांडीचे काम करते. मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दि. १८ ते २७ एप्रिलपर्यंत वारंवार मुलीसोबत वडिलाने गैरकृत केले. मुलगी घरात एकटी असताना वडील मुलीशी घृणास्पद प्रकार करत होता. या घटनेनंतर मुलगी घाबरुन जायची. या कृत्याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची वडील धमकी देत होते. अखेर घडलेल्या घटनेबाबत मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीने पोलिसांना घटना सांगितल्यांतर पोलीसही हादरुन गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ संशयित पित्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.त्यानंतर पित्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फौजदार नानासाहेब कदम हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

No comments