Header Ads

जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल crime

सातारा : पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोन्या (रा. महादरे, ता. सातारा), सचिन साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा), सचिन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या संशयितांचे पूर्ण पत्ते फिर्यादीला माहित नाहीत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय गोळे आणि सचिन साळुंखे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या वादातून अक्षयवर संबंधितांनी हल्ला केला. अंबेदरे येथील महालक्ष्मी मंदिराजवळ अक्षय गोळेला वरील संशयितांनी अडवले. मोन्याने अक्षयच्या डोक्यात दगड घातला तर इतरांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये अक्षय जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments